Saturday, February 19, 2011

हृदयात माझा शिवबा....!!

काळीज तूटलं शिवबाचं......
काय ही माझ्या राष्ट्रावर वेळ आली
विकला माझा राष्ट्र त्यांनी आज
दस-यांदा शिवबाची जयंती साजरी झाली......

अरे लेक हो.....सूर्य आहे तिथेच आहे
तो कधीही मावळत नाही
त्याची प्रखरता इतकी आहे आज की
तुम्ही मान उंचावून पाहू शकणार नाही

लाज वाटावी आज मराठी माणसाला
उप-यांसाठी आज तो इतका लढतो
आणि ज्या राष्ट्रासाठी प्राण अर्पिले
त्या शिवबाच्या हक्कासाठी तो मागे पडतो

शासकीय सुट्टी म्हणजे......जयंती नव्हे
माझ्या राजा बद्दल मनात प्रेम हवे.....
सांगा शासनाला....नको ती जयंती नको ती रजा
प्रत्येक दिवशी जन्माला येतोय.....हृदयात माझा राजा!!!!

आज शिवजयंती

 


आज शिवजयंती . आपणा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा.

जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया धृ

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनी तव हृदय का गेला ॥१॥

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥२॥

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन भगवदगीता सार्थ कराया या ॥३॥

ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ॥४॥

- स्वा.वी. विनायक दामोदर सावरकर

Wednesday, February 2, 2011

शिवनेरी गडावर जाण्याच्या वाटा


गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.
  • साखळीची वाट :
या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात . डाव्या बाजूस जाणा-या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते.भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पाय-यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.
  • सात दरवाज्यांची वाट :
शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पाय-यांपाशी घेऊनजातो. या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्तीदरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा .या मार्गेकिल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तासलागतो.
 कसे जाल ?
  • मुंबईहून माळशेज मार्गेः
जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ते९ किलोमीटरवरशिवनेरी १९ कि.मी.’ अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास एक दिवस लागत

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

शिवाई देवी मंदिर-
सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पूढे गेल्यावरशिवाई देवीचेमंदिर लागते. मंदीराच्या मागे असणा-या कडात ते गुहा आहेत.या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे .
  • अंबरखाना-
शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितिस या अंबरखान्याची मोठा प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात.एक वाट समोरच असणा-या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते.
  • पाण्याची टाकी-
वाटेत गंगा, जमुना याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात.
  • शिवकुंज -
हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे.याची स्थापना उदघाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली. जिजाउंच्या पुढात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आवीर्भावातील मायलेकरांचा पुतळाशिवकुंजामध्ये बसविला आहे.शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो.
  • शिवजन्म स्थान इमारत-
शिवकुंज येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरचबदामी पाण्याचे टाकंआहे.
  • कडेलोट कडा-
येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कडाचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे