Sunday, January 14, 2018


|| पानिपत युद्धात स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या मर्द मराठ्यांना त्रिवार मानाचा मुजरा ||
आज १४ जानेवारी १७६१ पानिपतचे युद्ध झाले त्या निमिताने आजचा विशेष लेख, हे युद्ध मराठे व
अहमदशा अब्दाली यांच्यात झाले याला आज २५७ वर्षे पूर्ण झाली ,या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला तरी अहमदशहा अब्दाली व वाय्यवेकडील बाद्शाहणी याचा चांगलाच धसका घेतला व यांनंतर कोणत्याही वाय्यवेकडील बादशहाणी आक्रमण केले नाही, आणि यातच खऱ्या अर्थाने मराठ्यांचा विजय झाला. अठराव्या शतकातील सगळ्यात मोठी लढाई अस वर्णन या लढाईच केल जात.मुघलांचा शेवटचा काळ हा १६८०-१७७० चा होता आणि त्याच वेळी त्यांचा ताब्यातील सगळ्यात मोठा बुभाग हा मराठ्यांच्या ताब्यात होता. या पानिपतच्या युद्धात अहमदशा च्या बाजूने एक लाख सैनिक व मराठ्यांच्या बाजूने ६० ते ७० हजार सैनिक उतरले होते.
या युद्धात मराठे उपाशी पोटी उतरले होते सुरवातीला मराठे आघाडीवर होते पण उपाशी मराठ्यांना शेवटी हार मानवी लागली आणि या युद्धात सगळ्यात जास्त मराठ्यांची हानी झाली.मात्र या युद्धाने जगासमोर मराठ्यांचा आणि महाराष्ट्राचा धाक निर्माण झाला. आजच्या या युद्धात स्वराज्यासाठी आपल प्राण अर्पण केलेल्या मराठा मावळ्यांना त्रिवार मानाचा मुजरा.