Friday, August 23, 2013

!! जय शिवराय !!

!! जय शिवराय !!
छत्रपति शिवबांचे चरण स्पर्शुनी जगदंबा मातेची शपत घेउनी मर्द
मराठ्यांनो एकत्र होऊनी संकल्पा ध्यान धरू आपल्या मनी
छत्रपती शिवरायांचे आचार विचार व संस्कार संपूर्ण जगात
घरोघरी पोहचवणे हेच आम्हां सर्वांचे ध्येय असले पाहिजे
सज्ज व्हा रे सुसज्ज व्हा रे भगव्या साठी एक व्हा रे
भगव्याचा माझ्या भगव्याचा आहे मला अभिमान
सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त
जय जय जय जय , जय भवानी
जय जय जय जय , जय शिवाजी....

Wednesday, February 6, 2013


स्वराज्य स्थापनेचे कार्य शहाजी महाराजांच्या हातूनच का सुरु झाले ते त्यांच्या पूर्वी असलेल्या सास्थानिकांच्याहातून का घडले नाही यासाठी राजवाडे राधामाधवविलासचंपू मध्ये काही कारणे देतात
१)राष्ट्र होण्याची प्रबळ इच्छा
२) राज्य व राष्ट्र कमावण्यात सर्वस्व अर्पण करण्याची इच्छा
३)मुसलमानी अधिसत्तेच्या केंद्रस्थानी वस्ती पडल्याने तेथील व्यंगे ,मत्सर,विकार,बळ,ऐश्वर्य इ. गोष्टींची खडानखडा माहिती
४)करौल सैन्य
५)कारीगार हत्यार
६)चाणाक्ष व चतुर मुत्सद्दी जवळ करण्याची बुद्धी
७)ह्या सर्व साधनांचा योग्य वापर करून घेण्याची बुद्धी
८)त्यास मूर्त स्वरूप देण्यास लागणारे शौर्य
९)आणि मनुष्यमात्राला आपल्या कह्यात वागवन्याचे दुर्मिळ कसब शहाजी राजांच्या अंगी जन्मजात असल्याने व त्यांच्या कर्तबगारीने ते सिद्ध झाल्याने त्यांच्या हातून जुन्या संस्थानिकांच्यास्वप्नांत नव्हते त्या स्वराज स्थापनेच्या महा कार्याचा प्रारंभ झाला , यातून जुने संस्थानिक आणि शहाजी महाराज यांच्या कर्तबगारीत फरक दिसून येतो


जरी दाटतो पूर्णतः अन्धकार |
दिसे मार्ग ना लक्ष्य सर्वस्वी दूर ||
आशा संकटी कोणी ना घाबरावे |
शिवराय चरित्रास भावे स्मरावे ||

असंख्यात गेले विरोद्हत लोक |
तरी घालणेना यमलाही भिक ||
जारी सागर एवढे म्लेंच्छ आले |
शिवराय आणि मावळे नाही भ्याले ||

करी घेऊ ते कार्य सिद्धिस नेवू |
असा सह्यनिर्धार चित्तात ठेवू ||
शिवराय आपत्ति पुढे नाही झुकले |
जगी स्वराज्य निर्माण केले ||

सुखाला आधी लाथ मारा ध्रृतीने |
उठा मार्ग चला कडया निश्चायाने ||
जगी गांडुळासारखे ना जगावे |
उरी बाजी तानाजीला संस्मरावे ||

नका भिक घालू कधी संकटाला |
उठा ठोकारा येई ते ज्या क्षणाला ||
मनाला नसावा कधी भिती स्पर्श |
जिजाऊसुताचा जगुया आदर्श ||

महामंत्र आहे नव्हे शब्द साधा |
जयांच्या भितीने जळे म्लेंच्छ बाधा ||
नूरे देश अवघा ज्याचे आभावी |
शिवराय जपु राष्ट्र मंत्र प्रभावी ||

जिथे मोगरा तेथ राहे सुवास |
जिथे कृष्ण तेथे जयाश्री निवास ||
शिवराय जपू मंत्र आर्त मतीनी |
शिवराय तिथे माय तुळजाभवानी ||

चाहू बाजुनी वादळे घेरतील |
कूणीही सवे सोबतीला नसेल ||
दिशा वाट सर्वस्वहि हारविता |
शिवराय असे मंत्र हा शक्ति दाता ||

करी खड्ग घ्या धर्म रक्षावयाला |
यशस्वी करा दिव्य भगव्या ध्वजाला ||
उठा फडकवा दिल्लीवरती निशान |
स्मरा अंतरी नित्य शिवसुर्यआण ||

उरी ध्येय ज्वाला असे पेटलेली |
अशाना करी लागती ना मशाली ||
रवि नित्य तेवे विना तेलवात |
अशांची शिवराय असे जन्मजात ||