Wednesday, August 8, 2018

BJP सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?


आजपर्यंत आरक्षणाच्या व कोपर्डीच्या बहिणीला न्याय मिळावा म्हणून मराठा समाजाचे एकूण ५८ मोर्चे अगदी शांततेत व नियोजनबद्धरीत्या मोर्चे निघाले. पण हे सरकार फक्त वेळकाडूपणा करत आहे. या वेळकाडूपणामुळेच या आरक्षणाचा पहिला बळी काकासाहेब शिंदे यांच्या रूपाने गेला. आतापर्यंत एकून १५ जनांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.म्हणूनच आता या फडणवीस सरकारचे डोके ठिकाणावर आहे का म्हणण्याची वेळ आली आहे. परवाच अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती उदयनराजे भोसले सरकार यांनी पुण्य्यात पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा दिला जर हे मोर्चे हाताबाहेर गेले तर मराठ्यांना कोणीच रोखू शकणार नाही. या पत्रकार परिषदेमध्ये महाराजांनी मराठा आरक्षण तसेच धनगर आरक्षण सरकारने त्वरित द्य्यावे अशी मागणी करून आपण खरच छत्रपती कशे असतात याची प्रचीती करून दिली.अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज या आंदोलनाचे नेतृत्व छत्रपती उदयन महाराजांकडे द्य्यावे अशी मागणी करत आहे पण महाराजांनी यास स्पष्ट नकार देत या मोर्चाचे नेतृत्व मी नाही आणि कोणीच करत नसून याचे नेतृत्व आंदोलनकरतेच करत असल्याची जाणीव करून दिली. तरी या बिनडोक सरकारने लवकरात लवकर याचा विचार करून मराठ्यांना आरक्षण द्यावे अन्यथा मराठ्यांना इतिहास कसा करावा हे चांगलाच ठाऊक आहे. उद्या होणारया महाराष्ट्र बंद आंदोलनामुळे या सरकारला मराठा समाजाची खरी ताकत कळून येईल.किमान मराठे आता रिकामे रस्त्यावर उतरले आहेत हे नशीब समजावे अन्यथा या बंदनंतर मराठे हातात खानदानी तलवारी गेऊन रस्त्यावर पडतील. व जेव्हा म्यानातून तलवारी बाहेर येतील तेव्हा नक्कीच नवीन स्वराज्य स्थापन होऊन इतिहास निर्माण होईल.