Wednesday, February 6, 2013


स्वराज्य स्थापनेचे कार्य शहाजी महाराजांच्या हातूनच का सुरु झाले ते त्यांच्या पूर्वी असलेल्या सास्थानिकांच्याहातून का घडले नाही यासाठी राजवाडे राधामाधवविलासचंपू मध्ये काही कारणे देतात
१)राष्ट्र होण्याची प्रबळ इच्छा
२) राज्य व राष्ट्र कमावण्यात सर्वस्व अर्पण करण्याची इच्छा
३)मुसलमानी अधिसत्तेच्या केंद्रस्थानी वस्ती पडल्याने तेथील व्यंगे ,मत्सर,विकार,बळ,ऐश्वर्य इ. गोष्टींची खडानखडा माहिती
४)करौल सैन्य
५)कारीगार हत्यार
६)चाणाक्ष व चतुर मुत्सद्दी जवळ करण्याची बुद्धी
७)ह्या सर्व साधनांचा योग्य वापर करून घेण्याची बुद्धी
८)त्यास मूर्त स्वरूप देण्यास लागणारे शौर्य
९)आणि मनुष्यमात्राला आपल्या कह्यात वागवन्याचे दुर्मिळ कसब शहाजी राजांच्या अंगी जन्मजात असल्याने व त्यांच्या कर्तबगारीने ते सिद्ध झाल्याने त्यांच्या हातून जुन्या संस्थानिकांच्यास्वप्नांत नव्हते त्या स्वराज स्थापनेच्या महा कार्याचा प्रारंभ झाला , यातून जुने संस्थानिक आणि शहाजी महाराज यांच्या कर्तबगारीत फरक दिसून येतो

No comments:

Post a Comment